महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhaskar Jadhav : अजित पवारांच्या निर्णयाला कोण स्थगिती देतं? मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? भास्कर जाधवांनी थेटच सांगितलं... - भास्कर जाधवांची अजित पवारांवर टीका

Bhaskar Jadhav On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचे धाडस महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री देखील करत नव्हते. मात्र, आता अजित पवारांच्या निर्णयाला मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस स्थगिती देतात. अजित पवारांचे खायचे दात वेगळे दिसले होते. आता दाखवायचे दात वेगळे दिसले असतील. एकनाथ शिंदे आणि अजित पवार याचं मूल्यमापन भाजपाने केलं आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Thackeray Group MLA Bhaskar Jadhav) यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Bhaskar Jadhav On Ajit Pawar
आमदार भास्कर जाधवांचा सरकारवर हल्लाबोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 8:25 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी बोलताना आमदार भास्कर जाधव

कोल्हापूर : Bhaskar Jadhav On Ajit Pawar :'सबका साथ, सबका विकास'च्या भाजपाच्या फक्त गप्पा आहेत. विकास नुसता धनदांडग्यांचा, आपल्या चेल्यांचा करायचा. जनतेला वाऱ्यावर सोडायचे. भाजपासह राज्यातील मित्र पक्षांच्या काळात राज्यभरातील कोणताही घटक सुखी नसल्याची टीकाही आमदार जाधव यांनी यावेळी केली.

बच्चू कडू त्रस्त का? : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे मित्र आहेत, त्यांना आमचा सल्ला उपयोगी पडणार नाही. मी त्यांना सल्ला देणार नाही. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्री केले. पण आता सत्तेत असूनही ते त्रस्त आहेत. का त्रस्त झाले? हे तुम्ही शोधा, असेही आमदार जाधव म्हणाले.

फसवण्याचा उद्योग भाजपाने सुरू केला : मराठा आरक्षणाचा उद्रेक भाजपा आणि फडणवीस यांच्यामुळेच झाला असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. मराठा आरक्षणाची मागणी पूर्वीपासून होती. आरक्षणाचा उद्रेक व्हायला भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, फडणवीस यांची पहिली कॅबिनेट अजून झालेली दिसत नाही. मराठा समाजाला आघाडीच्या काळात 2014 ला आरक्षण मिळाले होते, त्याचा लाभही मिळाला होता. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि हे आरक्षण गेलं, हे वास्तव स्वीकारा तसेच सरकार बदलून दीड वर्ष झाली तरी उद्धव ठाकरे यांना दोष देता. कोरोना काळ असताना उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक समाजाला शब्द द्यायचा, त्यांना फसवण्याचा उद्योग भाजपाने सुरू केला आहे. असे उद्योग बंद करा, असा सल्लाही आमदार जाधव यांनी भाजपा आणि फडणवीसांना दिला.

प्रत्येक समाजाला दुखावण्याचं काम भाजपानं केलं : 2024 ला देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार येणार नाही. प्रत्येक समाजाला दुखावण्याचं काम, नाराज करण्याचं कामं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. भाजपाचे फक्त एकच लक्ष आहे, दुसऱ्याचे पक्ष फोडणे आणि आपले सरकार टिकवणे. जनतेकडे यांचं लक्ष नाही, कोणतेही नैसर्गिक संकट नसताना महाराष्ट्रामध्ये लोकं किड्या-मुंग्यासारखे मरत आहेत आणि हे सरकार आपल्यामध्येच व्यस्त असल्याची टीका जाधव यांनी केली.

हेही वाचा:

  1. Rahul Narwekar Vs Thackeray Group : राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप; म्हणाले, 'माझ्या निर्णय प्रक्रियेवर...'
  2. Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांची चौकशी करा; शंभूराज देसाईंची मागणी, काय आहे प्रकरण?
  3. Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना...; 'त्या' प्रकरणावरून राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका

ABOUT THE AUTHOR

...view details