महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत मर्द असतील तर एकदा तरी चमत्कार करून दाखवावा; आमदार भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर

Bharat Gogawale On Sanjay Raut : आमदार भरत गोगावले हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबियांसह करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या (Karveer Nivasini Shree Ambabai) दर्शनाला कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. दर्शनानंतर गोगावले यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधताना, खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 10:08 PM IST

Updated : Jan 1, 2024, 10:36 PM IST

Bharat Gogawale On Sanjay Raut
संजय राऊत आणि आमदार भरत गोगावले

प्रतिक्रिया देताना आमदार भरत गोगावले

कोल्हापूर Bharat Gogawale On Sanjay Raut :नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नाहीत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर केली होती, याला आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale)यांनी उत्तरं दिलं आहे. खासदार राऊत मर्द असतील तर त्यांनी एकदा तरी चमत्कार करून दाखवावा, असं प्रत्युत्तर आमदार भरत गोगावलेंनी दिलंय.

गोगावलेंच्या मंत्रिपदाची चर्चा राज्यभर सुरू :नववर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्रिपद मिळेल असं वाटत आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आमदार भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाची चर्चा राज्यभर सुरू आहे. यासाठी त्यांनी राज्यभरातील अनेक मंदिरात जाऊन प्रार्थनाही केली आहे. सोमवारी कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन (Karveer Nivasini Shree Ambabai) घेऊन नववर्षाची सुरुवात केली. या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत आमदार गोगावले यांनी दिलं आहे.



राज्यातील प्रकल्प कुठेही जाणार नाहीत : सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्प गुजरातकडे जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. यावरून राज्य सरकार विरोधात राज्यभरात नाराजी ही पसरली आहे. याबाबत विचारलं असता, 'कोणताही प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील जनतेला अश्वस्त केलं आहे, त्यामुळं कोणताही प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही', असा विश्वास आमदार गोगावलेंनीं व्यक्त केला.



हिंदुत्वाच्या विचारावर दोन मराठी नेते एकत्र आल्यास आवडेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट झाली होती. हिंदुत्वाच्या विचारावर जर दोन मराठी नेते एकत्र येणार असतील तर ते आवडेल, पाच जानेवारीला रायगड जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाल्या याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे, जर हिंदूंच्या विचारावर दोन मराठी नेते एकत्र येत असतील तर ते आपल्याला आवडेल, असा आशावाद यावेळी आमदार गोगावले यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. नवीन वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना- देवेंद्र फडणवीस
  2. भाजपानं राम मंदिराचं मंगल कार्यालय करुन ठेवलंय; संजय राऊतांचा घणाघात
  3. शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत
Last Updated : Jan 1, 2024, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details