कोल्हापूर - राज्यातील एकाही शेतकऱ्याला खतं मिळणार नाही, असे होणार नाही. दुकानदारांनी सुद्धा शेतकऱ्यांना खतं तत्काळ उपलब्ध करून द्यावे. खतांचे लिंकिंग करू नका. शिवाय दुकानदारांनी दुकानात फलक लावून खतांचे दर आणि असलेली उपलब्धता याबाबत बोर्डवर लिहणे अनिवार्य आहे. शिवाय योग्य आणि वाजवी दरात खतं मिळावीत यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा काटेकोरपणे लक्ष ठेवावे, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज दिल्या. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दुकानदारांनी शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून द्यावी, कृषीमंत्र्यांच्या सूचना - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज
एकीकडे कोरोनाचे संकट होते. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बळीराजा सर्वांच्या मदतीला धावून आला. त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सर्वांनीच शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणे गरजेचे आहे. बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन एका समितीची स्थापना केली आहे.
एकीकडे कोरोनाचे संकट होते. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बळीराजा सर्वांच्या मदतीला धावून आला. त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सर्वांनीच शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणे गरजेचे आहे. बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन एका समितीची स्थापना केली आहे. सोयाबीनची उगवण झाली नसेल, तर त्याची उगवण का झाली नाही? याबाबत अभ्यास करून शास्त्रज्ञ तपासून पाहत आहेत. यामध्ये कोणी दोषी असेल तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सुद्धा दादा भुसे यांनी दिला. महाबीज देखील दोषी असेल तर कारवाई केली जाईल. तोपर्यंत महाबीज किंवा इतर कंपन्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे उपलब्ध करून द्यावे, असेही भुसे यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, पीककर्जासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात कमी, अधिक प्रमाणात पीक कर्जाचे वाटप झाले आहे, हे मान्य आहे. शिवाय लोकशाही प्रक्रियेत आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.