महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Daughter Born: आनंद तर होणारच... तब्बल 35 वर्षांनी कुटुंबात जन्मली मुलगी, हत्तीवरून काढली मिरवणूक

घरात मुलगा जन्माला आला नाही म्हणून अनेकजण नाराज झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र कोल्हापुरातील पाटील कुटुंबीयांच्या घरात तब्बल 35 वर्षानंतर मुलगी झाली. तर बापाने लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला तोही चक्क हत्तीवरून मिरवणूक काढून. या स्वागताची चर्चा सध्या पंचक्रोशीत होत आहे.

Girl welcome
हत्तीवरून काढली मिरवणूक

By

Published : May 27, 2023, 5:12 PM IST

Updated : May 27, 2023, 5:20 PM IST

बापाने लेकीची चक्क हत्तीवरून मिरवणूक

कोल्हापूर :आपल्या समाजात जिथे वंशाला दिवा पाहिजे असे म्हणत, घरात मुलगी झाली की नाराज होणारी मंडळी आहेत. त्याच समाजात घरात मुलगी जन्मली म्हणजे लक्ष्मी आली असेही म्हणतात. तिचे जंगी स्वागत करणारी मंडळी देखील समाजात आहेत. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीत मुली मुलाच्या बरोबरीने उभ्या आहेत. अनेक जणांना घरात वंशाचा दिवा नसला तरी, मुलगी हीच आपला वंशाचा दिवा म्हणत तिला मोठ्या प्रेमाने सांभाळतात. तर काही जणांच्या घरात मुलीच होत नसल्याने घरात एखादी तरी मुलगी असावी, या विचारात काही जण नाराज होत असतात. असाच एक प्रत्यय कोल्हापुरात देखील आला आहे.

हत्तीवरून काढली मिरवणूक: एखाद्या घरात मुलगी जन्माला आली की, अनेक लोक नाक तोंड मुरडतात. मात्र तब्बल ३५ वर्षानंतर घरामध्ये मुलीचा जन्म झाला म्हणून, बापाने लेकीचे स्वागत चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत केली आहे. कोल्हापुरातील पाचगावमध्ये राहणारे गिरीश पाटील कुटुंबीयांनी, त्याच्या नवीन बाळाचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात आणि सामाजिक संदेश देत हत्तीवरून मिरवणूक काढत केले आहे.

पाचगावमध्ये राहणारे गिरीश पाटील यांच्या घरात तब्बल 35 वर्षांनी मुलगी जन्मली. मुलीची हत्तीवरून मिरवणूक काढली. या माध्यमातून मुली प्रती असलेले प्रेम आणि यासोबतच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पाटील कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. - गिरीश पाटील, वडील

35 वर्षानंतर मुलगीचा जन्म: कोल्हापुरातील पाचगाव येथे राहणारे गिरीश पाटील कुटुंबीयांच्या घरात गेल्या 35 वर्षापासून मुलगीच जन्माला आले नाही. यामुळे पाटील कुटुंबियांमध्ये मुली प्रति आकर्षण आणि प्रेम होते. गेल्या पाच महिन्यापूर्वी पाटील कुटुंबीयांच्या घरात एक गोंडस अशी मुलगी जन्माला आली. संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. तर मुलीचे नाव देखील ईरा ठेवण्यात आले. दरम्यान आज पाटील कुटुंबीयांमधील ही गोंडस मुलगी म्हणजे ईरा पाचगाव येथील घरात पहिल्यांदाच येत होती. यामुळे तिचे जंगी स्वागत करायचे असे पाटील कुटुंबियांनी ठरवले.

तब्बल 35 वर्षांनी कुटुंबात जन्मली मुलगी

मुली प्रती प्रेम आणि सामाजिक संदेश: आपल्या लाडक्या मुलीच्या स्वागतासाठी चक्क हत्ती आणला. मुलीची हत्तीवरून मिरवणूक काढत तिचे घरामध्ये स्वागत केले. यावेळी या मिरवणुकीत हत्ती बरोबरच ढोल ताशा आणि तुतारी सोबत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. लहान लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत सजवले होते, हातात सामाजिक संदेश देणारे बोर्ड देण्यात आले होते. मुलीचे स्वागत इतक्या मोठ्या पद्धतीने होत असलेले पाहून परिसरातील अनेक नागरिक याकडे कुतूहलाने पहात होते. सध्या या मुलीची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे. या माध्यमातून मुली प्रती असलेले प्रेम आणि यासोबतच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पाटील कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. सांगलीतील दाम्पत्याकडून मुलीच्या जन्माचे थाटात स्वागत
  2. Transgender Couple Birth Baby ट्रान्सजेंडर जोडप्याने दिला बाळाला जन्म लिंग ओळख सांगण्यास नकार
  3. Mother of Twins with IVF सूरतची इंजिनियर महिला वयाच्या 41 व्या वर्षी बनली सिंगल मदर जुळ्या मुलांना जन्म दिला
Last Updated : May 27, 2023, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details