कोल्हापूर- 'स्मृती काकी बेस्ट कॅम्पेन मॅनेजर आहे. मी खासदार होईल, असे त्यांना सांगितले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मी कॅम्पेन मॅनेजर होईल. त्यानंतर मी त्यांना होकारही दिला', असे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची मुलगी आदिश्री माने हिने सांगितले.
काही दिवसांपूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची मुलगी आदीश्री माने संसदेमध्ये अनेक खासदारांना भेटल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी तिने अनेक खासदारांची भेट घेतली. स्मृती इराणींचीही तिने भेट घेतली होती. नुकतेच आदीश्रीने खासदार स्मृती इराणींना एक शुभेच्छा पत्र पाठवले होते. त्यामध्ये तिने त्यांना त्यांची आठवण काढत कोल्हापूरला येण्याचे सांगितले आहे. स्मृती इराणी यांनीही ते शुभेच्छापत्र त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.