महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान करणे काळाची गरज, 'आर्ची'चे मतदारांना आवाहन - voting

'मतदान करणे काळाची गरज आहे. युवा पिढीचा तो अधिकार आहे. आपल्याला कोणता बदल हवा आहे आणि कोणता राजकारणी तो देतोय, हे पाहूनच त्या उमेदवाराला निवडून मतदान करा, असे रिंकुने यावेळी म्हटले आहे.

मतदान करणे काळाची गरज, 'आर्ची'चे मतदारांना आवाहन

By

Published : Apr 11, 2019, 9:32 PM IST

कोल्हापूर - सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहे. जुने बुलंद नेतृत्व थोडे बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसत आहेत. निवडणूकीच्या याच पार्श्वभूमीवर सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्ची हिचा 'कागर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपटदेखील ग्रामीण राजकारणावरच आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि अभिनेता शुभंकर तावडे यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
'मतदान करणे काळाची गरज आहे. युवा पिढीचा तो अधिकार आहे. आपल्याला कोणता बदल हवा आहे आणि कोणता राजकारणी तो देतोय, हे पाहूनच त्या उमेदवाराला निवडून मतदान करा, असे रिंकुने यावेळी म्हटले आहे.

मतदान करणे काळाची गरज, 'आर्ची'चे मतदारांना आवाहन
रिंकुचा आगामी 'कागर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'सैराट' या पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येत आहे. 'तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार' अशा आरोळ्या देत रिंकू 'कागर'च्या प्रचाराच्या रनधुमाळीत नव्या जोशात उतरली आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात करण्यात आले आहे. रिंकूदेखील नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवते ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणते ते राजकारण. एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा 'कागर' २६ एप्रिलपासून रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details