कोल्हापूर -ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल ( Gram Panchayat Result 2022 ) आज हाती आले आहेत. जिल्ह्यात एकूण 473 ग्रामपंचायत निवडणुकांचे ( Gram panchayat Election 2022) निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले असून अनेकांनी दिग्गजांना घाम फोडत विजेतेपद खेचुन आणले आहे. अशीच एक घटना कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील गावात घडली आहे. एक भाजी विक्रेता ते सरपंच ( Vegetable Seller Become A Sarpanch In Kolhapur ) पदापर्यंत पोहोचण्याचा पराक्रम येथील आनंदा रामचंद्र भोसले या तरुणाने केला आहे. येथील बांबवडे बाजारपेठेत भाजी विक्री करणारा तरुण आता थेट वरेवाडी गावातील ग्रामपंचायतीत ( Gram Panchayat Election 2022) सरपंच पदाच्या खुर्चीवर बसणार आहे. कोण आहे आनंदा हा तरुण पाहा या विशेष रिपोर्टमधून.
भाजी मार्केटमधून थेट सरपंच पदाच्या खुर्चीतशाहूवाडी तालुक्यात एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या आनंदा रामचंद्र भोसले ( Vegetable Seller Become A Sarpanch In Kolhapur ) या तरुणाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने ( Thackeray Faction Kolhapur ) सरपंच पदासाठीचे तिकीट दिले. विशेष म्हणजे अनेक अडचणींचा सामना करत त्याचा आजपर्यंत प्रवास सुरु आहे. विशेष म्हणजे येथील एका मार्केटमध्ये तो भाजी विक्री ( Vegetable Market Kolhapur ) करतो. मात्र आता तो आपल्या व्यवसायासोबतच थेट गावातील ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसणार आहे. त्याने कोरे गटाच्या विश्वास भोसले यांचा पराभव केला.
हॉटेलमध्ये रुमबॉयचे काम करत घेतले शिक्षणआनंदा भोसले ( Vegetable Seller Become A Sarpanch In Kolhapur ) याने येथील शिवाजी विद्यापीठातून ( Shivaji University Kolhapur ) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्याने कोल्हापूरातील एका हॉटेलमध्ये रुमबॉयचे ( Room Boy In Hotel ) काम करत असताना पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर गावात भाजीचे दुकान सुरू केले. त्याच्या या प्रवासाची अनेकांना जाणीव असल्यानेच आनंदा भोसले ( Vegetable Seller Become A Sarpanch At Kolhapur ) याला आज गावकऱ्यांनी मोठ्या मतांनी विजयी केले अन थेट सरपंच पदावर ( Gram Panchayat Election 2022 ) विराजमान केले आहे.
एवढ्या गावात होत्या निवडणुका
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - 474