कोल्हापूर- व्हिनस कॉर्नर येथे बचावकार्य करताना बोट पलटल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढत असताना अचानक ही बोट पलटली. मात्र बचाव पथकाने वेळीच मदत करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.
कोल्हापुरात बचावकार्य करताना बोट पलटली - rescue squad
कोल्हापुरात पुराच्या पाण्यामुळे अनेकजण घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी ७०० ते ८०० जणांची टीम कार्यरत आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ चे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. यादरम्यान तीन महिलांचे बचावकार्य करताना बचाव पथकाची बोट पलटली.
कोल्हापुरात पुराच्या पाण्यामुळे अनेकजण घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी ७०० ते ८०० जणांची टीम कार्यरत आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ चे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. यावेळी व्हिनस कॉर्नर येथे अडकलेल्या तीन महिलांचे बचावकार्य सुरू असताना बचाव पथकाची बोट पलटली. वेळीच मदत मिळाल्याने तिन्ही महिला आता सुखरूप आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे. दरम्यान, कालपासून दिवस रात्र बचाव कार्य सुरू आहे. २० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.