महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन पानी जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक; सुमारे ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त - जुगार इचलकरंजी न्यूज

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार इचलकरंजी शहरात कडक लॉकडाऊन सुरु आहे. असे असताना देखील मोठे तळे परिसरातील पोवार गल्लीत असणाऱ्या होगाडे यांच्या इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन आणि गर्दी करत तीन पानी जुगार अड्डा सुरु होता.

जुगार अड्डा
gambling

By

Published : May 19, 2021, 12:29 PM IST

Updated : May 19, 2021, 1:31 PM IST

कोल्हापूर - इचलकरंजी शहरात एका इमारतीच्या गच्चीवर गर्दी करून तीन पानी जुगार खेळणाऱ्या नागरिकांवर गावभाग पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत मात्र, अशा घटनेवरून अनेकांना अजूनही कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

तीन पानी जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक
इमारतीच्या गच्चीवर सुरू होता जुगार अड्डाजिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार इचलकरंजी शहरात कडक लॉकडाऊन सुरु आहे. असे असताना देखील मोठे तळे परिसरातील पोवार गल्लीत असणाऱ्या होगाडे यांच्या इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन आणि गर्दी करत तीन पानी जुगार अड्डा सुरु होता. याची माहिती गांवभाग पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने अचानक छापा टाकला. यामध्ये जुगार खेळणाऱ्या प्रवीण होगाडे, प्रसन्न होगाडे, राजू साळुंखे, महेश कोपार्डे, हेमंत कोळी, चंद्रकांत कोपार्डे, गजानन पोवार अशा सात जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील रोख २३ हजार रुपये आणि चार मोबाईल असा सुमारे ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Last Updated : May 19, 2021, 1:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details