कोल्हापूर- आज दुपारी प्राप्त झालेल्या 134 अहवालांपैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्रीपासून आणखी 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 3 जण चंदगडमधील, शाहूवाडीतील 1 आणि आजरामधील 1 अशा 5 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजअखेर 725 रुग्णांपैकी 644 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 73 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात एकूण 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.