महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात मे महिन्यात कोरोनाचा कहर; तब्बल 44 हजार 171 नवे रुग्ण तर 1 हजार 418 जणांचा मृत्यू

एप्रिल महिन्यात 16 हजार 916 नवीन रुग्ण आढळले होते. मात्र मे महिन्यात तब्बल 44 हजार 171 नवे रुग्ण आढळले आहेत. शिवाय 1 हजार 418 जणांचा मृत्यूही झाला आहे. आजही जिल्ह्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे.

Kolhapur corona news
कोल्हापूरात मे महिन्यात कोरोनाचा कहर; तब्बल 44 हजार 171 नवे रुग्ण तर 1 हजार 418 जणांचा मृत्यू

By

Published : Jun 1, 2021, 3:07 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये मे महिन्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. एप्रिल महिन्यात 16 हजार 916 नवीन रुग्ण आढळले होते. मात्र मे महिन्यात तब्बल 44 हजार 171 नवे रुग्ण आढळले आहेत. शिवाय 1 हजार 418 जणांचा मृत्यूही झाला आहे. आजही जिल्ह्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 269 वर पोहोचली आहे त्यातील 93 हजार 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 3712 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 16 हजार 015 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 269 वर पोहोचली आहे. त्यातील 93 हजार 542 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 015वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 3 हजार 712 झाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात 44 हजार 171 नवे रुग आढळले आहेत. त्यातील 36 हजार 403 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1418 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्याचा विचार केल्यास एप्रिलमध्ये 16 हजार 916 रुग्ण आढळले होते. त्यातील 7 हजार 573 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 522 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 202 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 4159 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 8593 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 64131 रुग्ण
51 ते 70 वर्ष -28727 रुग्ण
71 वर्षांवरील - 7457 रुग्ण

जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 13 हजार 269 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 36
2) भुदरगड - 68
3) चंदगड - 63
4) गडहिंग्लज - 86
5) गगनबावडा - 30
6) हातकणंगले - 189
7) कागल - 53
8) करवीर - 303
9) पन्हाळा - 146
10) राधानगरी - 26
11) शाहूवाडी - 29
12) शिरोळ - 180
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 220
14) कोल्हापुर महानगरपालिका - 433
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 74

ABOUT THE AUTHOR

...view details