महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 13, 2019, 10:35 AM IST

ETV Bharat / state

जालना : कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

विलास श्रीरंग तांगडे (वय 36) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तांगडे यांच्या कडे दिड ऐकर शेती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक व खाजगी असे मिळून तीन ते चार लाखांचे कर्ज होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले.

मृत विलास श्रीरंग तांगडे

जालना -भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतातील गोठ्यात घळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विलास श्रीरंग तांगडे (वय 36) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले.

हेही वाचा - ठाण्यात शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

तांगडे यांच्या कडे दिड ऐकर शेती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक व खाजगी असे मिळून तीन ते चार लाखांचे कर्ज होते. परतीच्या पावसामुळे त्यांच्या शेतातील सर्व माल वाहुन गेला होता. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा, मुलगी व आई , असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, यासंदर्भात बुलढाणा पोलीस चौकीत आकसत्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details