जालना- जिल्हा ऑरेन्ज झोनमध्ये येत आहे. त्यामुळे, काही व्यवहार सुरळीत सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आज सकाळी शहरामध्ये टायरची दुकाने, शेती साहित्याची दुकाने सुरु केली गेली .यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. त्यामुळे, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत अनेक दुकानदारांकडून दंड आकारला.
लॉकडाऊनचे उल्लंघन, जालन्यातील नागरिकांची रस्त्यांवर गर्दी
रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांमुळे होत असलेली गर्दी पाहून त्यांचे साहित्यही जप्त केले गेले. नवीन जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी पाहता पोलिसांनी या भागामधील दुकाने बंद करायला लावली.

ज्या दुकानदारांच्या तोंडाला मास्क नाही, अशांना दंडही ठोठावला आहे. आज काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू झाली आहे. त्यामुळे, शहरात लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे. पोलीस प्रशासनदेखील या गर्दीपुढे हतबल झाले आहे.: