महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका - विनायक मेटे - विनायक मेटे

मराठा आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारने घोडचुका करून ठेवल्या आहेत. नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांची परिस्थिती काय? शैक्षणिक प्रवेशाचे काय? यासंदर्भात कुठलाही स्पष्ट उल्लेख या आरक्षणामध्ये नाही, असा आरोप आ. विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

vinayak mete on maratha reservation
विनायक मेटे

By

Published : Dec 26, 2020, 4:48 PM IST

Updated : Dec 26, 2020, 4:58 PM IST

जालना - मराठा आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारने घोडचुका करून ठेवल्या आहेत. नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांची परिस्थिती काय? शैक्षणिक प्रवेशाचे काय? यासंदर्भात कुठलाही स्पष्ट उल्लेख या आरक्षणामध्ये नाही. या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्याचे सोडून अशोक चव्हाण राजकारण करण्यात गुंग आणि मग्न आहेत, असा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. विनायक मेटे यांनी केला आहे.

सरकार जाणीवपूर्वक संभ्रम वाढवत आहे -

आ. विनायक मेटे काही वेळासाठी जालन्यात थांबले होते त्यावेळी ईटीव्हीशी बोलताना आ. मेटे म्हणाले की, सरकारने आरक्षण दिले असले तरी राज्य शासनाने यामध्ये मोठ्या घोडचुका करून ठेवलेल्या आहेत. नोकर भरतीमध्ये कोणत्या कोट्यातून आरक्षण दिलं जाणार आहे? शैक्षणिक प्रवेशाचे काय? याचा स्पष्ट उल्लेख नाही. या घोड चुका सरकार करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि हे सरकार हा संभ्रम वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहे. खरे तर या सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख करायला हवा होता. मात्र तो न करता अशोक चव्हाण राजकारण करण्यातच गुंग आहेत. त्यामुळे आठ लाखांची मर्यादा असली तरीही यापूर्वी भरती झालेल्या सर्वांना ईडब्ल्यूएसमधून नियुक्त्या दिल्या पाहिजेत.अन्यथा सरकारने कितीही अध्यादेश काढले तरी त्याचा उपयोग होणार नसल्याचेही मेटे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना विनायक मेटे

पूर्वीच्या सरकारचे कौतुक -


यापूर्वीच्या सरकारने काय केले? असे विचारले असता फडणवीस सरकारने आरक्षण देण्याचे काम केले. महामंडळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि शिक्षणाची फी प्रतिपूर्ती त्यांनी केली आहे. सारथी सारख्या संस्थेलाही त्यांनी उभे करण्याचे काम केले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण हे मराठा समाजाची दिशाभूल करत असून घराघरात भांडणे लागतील, अशा पद्धतीचे निर्णय घेत आहेत. मराठा समाजाच्या विकासासाठी एकही काम केले नसल्याचा आरोपही आमदार विनायक मेटे यांनी केला.

Last Updated : Dec 26, 2020, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details