औरंगाबाद- मुंबईतील चेंबूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर ४ नराधमांनी पाशवी बलात्कार केला होता. तेव्हापासून अत्यवस्थ झालेल्या पीडितेवर औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना घडून महिना उलटला मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास आई-वडिलांनी नकार दिला आहे.
सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास आई-वडिलांचा नकार - mumbai
18:48 August 29
सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेचा मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास आई-वडिलांचा नकार
अशी आहे संपूर्ण घटना
मूळ जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारी १९ वर्षीय तरुणी मुंबईतील चेंबूर येथे राहणाऱ्या भावाकडे गेली होती. तेथेच ती भावाच्या मुलाचा सांभाळ करत होती. ७ जुलै रोजी मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली आणि एकट्या मुलीला पाहून ४ नराधमांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या घटनेनंतर तरुणी प्रचंड भेदरली आणि आजारी पडली २ दिवस तिने कोणालाही काही न सांगता ती एकटी झोपून होती. त्यानंतर आई-वडिलांनी तरुणीला जालना येथील मूळ गावी घेऊन आले. मात्र, दिवसेंदिवस तरुणीची प्रकृती खराब होत असल्याने पालकांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय घाटी रुग्णालयात हलविले होते.
तेव्हा उपचारा दरम्यान तरुणीवर अत्याचार झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. आई-वडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिच्यावर ४ जणांनी अत्याचार केला असल्याचे तरुणीने सांगितले. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तो मुंबईच्या चुनभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी औरंगाबादेत येऊन पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क केला नाही.
महिनाभरापासून नराधम बलात्कारी फरार आहे. पोलिसांना आरोपींना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नातेवाईकांचा पोलिसांवर रोष पाहायला मिळत आहे. मागील महिनाभरात पोलिसांनी आमच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक केली पाहिजे होती. मात्र, आम्हाला एक फोन देखील पोलिसांनी केला नाही. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा पीडीतेच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.