महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचे नाराज आमदार दिल्लीदरबारी, आज सोनिया गांधी यांची घेणार भेट

राज्यातील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या अधून मधून येत होत्या. पण, आघाडीतील प्रमुख नेते मात्र हम साथ साथ है चा राग आवळत होते. विरोधकांचे दावे कसे फोल आहेत, आमचे तीनचाकी रिक्षाचे सरकार भक्कम आहे, असे दावे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून केले जात होते. परंतु नाराजी जास्त काळ दबून राहत नाही, हे काही दिवसांपूर्वी राज्यातील काॅंग्रेसच्या नाराज पंधरा आमदारांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून दाखवून दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराजी आणि तक्रारी पाहता सोनिया गांधी यांनीही याची गंभीर दखल घेत या आमदारांना दिल्ली दरबारी बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे नाराज आमदार ( Congress MLA ) मंगळवारी (दि. 5 एप्रिल) दिल्लीत दाखल झाले आहे

v
v

By

Published : Apr 5, 2022, 4:11 PM IST

जालना -राज्यातील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या अधून मधून येत होत्या. पण, आघाडीतील प्रमुख नेते मात्र हम साथ साथ है चा राग आवळत होते. विरोधकांचे दावे कसे फोल आहेत, आमचे तीनचाकी रिक्षाचे सरकार भक्कम आहे, असे दावे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून केले जात होते. परंतु नाराजी जास्त काळ दबून राहत नाही, हे काही दिवसांपूर्वी राज्यातील काॅंग्रेसच्या नाराज पंधरा आमदारांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांना पत्र पाठवून दाखवून दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराजी आणि तक्रारी पाहता सोनिया गांधी यांनीही याची गंभीर दखल घेत या आमदारांना दिल्ली दरबारी बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे नाराज आमदार ( Congress MLA ) मंगळवारी (दि. 5 एप्रिल) दिल्लीत दाखल झाले आहेत. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या मार्फत हे आमदार सोनिया गांधीची ( Sonia Gandhi ) भेट घेऊन आपल्या तक्रारींचा पाढा वाचणार आहेत.

मराठवाड्यातून यात परभणीचे सुरेश वरपूडकर, जालन्याचे कैलास गोरंट्याल आणि विधान परिषदेतील राजेश राठोड हे दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील एका मंत्र्यांच्या विरोधात या आमदारांच्या काही तक्रारी असल्याचे बोलले जाते. जालन्याचे आमदार गोरंट्याल यांनी तर काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद व अन्य स्थानिक स्वराज संस्थाना निधी देताना भेदभाव केला जातो, असा आरोप करत आपली नाराजी पूर्वीच जाहीर केली होती. आता इतर नाराजांचे बळही त्यांना मिळाल्याने ते सोनिया दरबारात कुणाची तक्रार करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वरपूडकर यांनीही एका पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच पक्षातील नेत्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तर सरकारमध्ये निर्णय घेताना काॅंग्रेसला विश्वासात घेतले जात नाही, असा सूर काही मंत्र्यांनीच लावला होता.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राज्यातील दौऱ्यांमध्येही पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. औरंगाबादेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यातही पदाधिकाऱ्यांनी कामे होत नसल्याची ओरड केली होती. या पार्श्वभूमीवर काॅंग्रेच्या नाराज पंधरा आमदारांनी दिल्लीत दाखल होताच प्रथम राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल यांची भेट घेतली. काँग्रेसच्या वाट्याला येणारे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. विविध महामंडळे, शासकीय समित्यांवरील नियुक्त्या अद्याप केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे काही आमदारांची काँग्रेसच्या मंत्र्यांविरुद्ध तक्रार आहे. कॉंग्रेसचे काही आमदार आणि मंत्री पदाधिकाऱ्यांची कामे करीत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कारणांमुळे कॉंग्रेसचे आमदार आज सोनिया गांधींची भेट घेतील, अशी प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा -Accused Suicide Attempted Jalna : जालन्यात संशयित आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details