जालना -शहरात सोमवारपासून संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीमुळे शहरातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे कदाचित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटले असण्याची शक्यताही आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 37 झाली आहे.
जालन्यामधील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले मात्र मृत्यूचे वाढले; शुक्रवारी दोघांचा बळी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 37 पर्यंत झाली आहे.
शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जालना जिल्ह्यामध्ये फक्त आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. मात्र, आज सकाळी दोन रुग्ण कोरोना आजारामुळे मृत्यू पावल्याची नोंद करण्यात आली आहे. मृत्त झालेल्यांमध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 57 वर्षाचा तर जालना शहरातील पेन्शनपुरा भागातील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. टेंभुर्णी येथील व्यक्तीला 27 जून रोजी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. जालना शहरातील महिला ही 7 जुलै रोजी भरती झाली होती. उपचारादरम्यान आज या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.