महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 12, 2019, 12:27 PM IST

ETV Bharat / state

जालना : बायपास रस्त्यावर दोन बस व ट्रकचा विचित्र अपघात, प्रवासी किरकोळ जखमी

जालना शहरातील बायपास रस्त्यावर कन्हैया नगर येथे दोन बस आणि एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.

दोन बस एक ट्रकचा अपघात प्रवासी किरकोळ जखमी

जालना - शहरातून नागपूरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर कन्हैयानगर येथे सकाळी नऊच्या सुमारास दोन बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. बसला मागून येणाऱ्या साखरेच्या ट्रकने धडक दिल्यामुळे बस समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या बसवर जाऊन आदळली. अपघातामध्ये बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर, धडक दिलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात गेला.

दोन बस एक ट्रकचा अपघात प्रवासी किरकोळ जखमी

सकाळी दहाच्या सुमारास औरंगाबाद नागपूर आणि औरंगाबाद चांदूर बाजार या दोन बसेस जालना बस स्थानकातून निघाल्या. शहराच्या बाहेर पडतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. साखरेचा ट्रक चांदूरबाजार बसवर आणि चांदूरबाजारची बस नागपूर बसवर आदळली. या अपघातात चांदूरबाजार बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. नागपूर बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले. या प्रकरणाचा तपास आणि पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details