महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशी दारू चोरीप्रकरणी दोघांना अटक, मुद्देमालही जप्त - जालन्यात देशी दारू चोरीप्रकरणी दोघांना अटक

देशी दारूच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून दारूच्या 30 खोक्यांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

जालना
जालना

By

Published : Apr 3, 2020, 8:22 PM IST

जालना - देशी दारूच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून दारूच्या 30 खोक्यांची चोरी करण्यात आली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ईदेवाडी येथे राहणाऱ्या अक्षय शिरसागर (वय 25) आणि अंकुश शिंदे (वय 24) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांकडे पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे यांनी विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.

याबाबत 31 मार्चला उल्हास कोल्हे यांनी तक्रार दिली होती. या दोन्ही आरोपींकडून जालना तालुका पोलिसांनी चोरी केलेल्या खोक्यांपैकी देशी दारूची चार खोकी आणि चोरीत वापरलेली मोटारसायकल, असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांच्यासह सुभाष खरात, संदीप लोहारे, उमेश साबळे, अरुण मुंडे, सुनील गांगे आदींनी सहकार्य केले.

ABOUT THE AUTHOR

...view details