जालना - अशासकीय संस्थांना परदेशातून येणारा पैसा आणि त्या पैशांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिशोब मागितल्यामुळे डावे संतापले आहेत. हे सरकार असहिष्णू असल्याचा आरोप करत आहेत. एवढेच नव्हे तर डाव्यांच्या या संस्थांना हिशोबासाठी वेळ देऊनही त्यांनी हिशोब न सादर केल्यामुळे भारतातील २० हजार एनजीओंना मोदींनी एका झटक्यात बंद केले आहे, असा आरोप प्रसिद्ध विचारवंत, पत्रकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी रविवारी रात्री केला.
मोदींनी 'एनजीओ'चा हिशोब मागितल्यामुळे डावे संतापले - डॉ. सच्चिदानंद शेवडे - shevade
कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात रविवारी राम मंदिरच का? व जमात-ए-पुरोगामी, या दोन पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार शिवरतन मुंदडा, मनोज महाराज गौड, विनायक देशपांडे, डॉ. श्रीमंत मिसाळ, मुरली काकड उपस्थित होते.
येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात रविवारी राम मंदिरच का? व जमात-ए-पुरोगामी, या दोन पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार शिवरतन मुंदडा, मनोज महाराज गौड, विनायक देशपांडे, डॉ. श्रीमंत मिसाळ, मुरली काकड उपस्थित होते.
सरकारवर असहिष्णुतेचा वारंवार आरोप केला जातो, मात्र तो का केला जातो हे सांगताना त्यांनी डाव्यांचे पितळ उघडे पाडले. सरकार असहिष्णू असल्याचा आरोप करणाऱ्या लेखक साहित्यिकांनी मध्यंतरी पुरस्कार वापसीचा धडाका लावला होता. यामध्ये त्यांनी फक्त प्रमाणपत्र परत केली. मात्र, त्यांना रोख स्वरूपात देण्यात आलेल्या रकमा का परत केल्या नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला, यामधील बहुतांशी लेखक हे लेखक, साहित्यिक आहेत हे त्या पुरस्कार वापसीनंतर जनतेला कळाले. प्रसिद्धीसाठी टीव्हीवर प्रमाणपत्र झळकवत बोलताना दिसत होते. परंतु, बक्षिसांची रक्कम परत देतांना एकाचा तरी फोटो आला का? असा टोमणा त्यांनी मारला.
डाव्या विचारसरणीच्या लोकांचा समाचार घेताना शेवडे पुढे म्हणाले की, आपले ४४ सैनिक शहीद झाल्यानंतर २ दिवस देश शोकसागरात होता. त्यानंतर एअर स्ट्राईक झाला आणि त्याच्याही नंतर दोन दिवसांनी यांच्यातीलच काही लोकांनी ही राजकीय चाल असल्याचे वक्तव्य केले आहे. आपल्याच देशातील आपल्याच सैनिकांबद्दल असे वक्तव्य करताना या डाव्या विचारसरणीच्या लोकांना लाज वाटायला पाहिजे होती? असेही ते म्हणाले.
आपल्या जवानांना मारणे ही राजकीय चाल असू शकते? असे सडलेले विचार फक्त हीच मंडळी करू शकते आणि यांच्या अशा विचारसरणीमुळे दुसरा देश यांचा फायदा घेत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या भारताचे जवान कुलभूषण यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये सुरू असलेला खटला. डाव्या विचारसरणीच्या थापर, आणि स्वामी या दोघांनी दैनिकात लिहिलेले लेख पाकिस्तानने कुलभूषणच्या विरोधात पुरावे म्हणून वापरले आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशात आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याचा हे कांगावाही हे करत आहे, मात्र यांच्या अशा लिखाणामुळे देश अडचणीत सापडत असल्याचे म्हणाले.