महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID -१९ : परदेशातील 60 पैकी 12 नागरिक परतले, तपासणीसाठी शोध सुरू - विलगीकरण

जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत 67 नागरिकांना घरातच अलगीकरण म्हणजे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर दहा नागरिकांना सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली असून सध्या 7 जण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती आहेत.

जालना सामान्य रुग्णालय
जालना सामान्य रुग्णालय

By

Published : Mar 22, 2020, 11:03 PM IST

Updated : Mar 22, 2020, 11:25 PM IST

जालना- जिल्ह्यातील नागरिकांपैकी अधिकृत आकडेवारीनुसार सध्या 60 नागरिक अन्य देशांमध्ये ते राहत आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांसाठी गेलेले हे नागरिक आहेत. दरम्यान, या नागरिकांपैकी आज 12 जण परतले आहेत. या बारा जणांचा जिल्हा प्रशासन शोध घेत आहेत. त्यांची तपासणी देखील आरोग्य विभागाच्यावतीने केली जाणार आहे.

परदेशातील 60 पैकी 12 नागरिक परतले, तपासणीसाठी शोध सुरू

आज परतलेल्या नागरिकांमध्ये अबुधाबी-3, दुबई-2, बांगलादेश-2, बँकॉक-4 आणि श्रीलंका-1 अशा एकूण बारा नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या देशाबाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये दुबई-6 , थायलँड-6, युक्रेन-2, रशिया-5, कॅनडा-2, दक्षिण आफ्रिका-3, सौदी अरेबिया-7, कतार-3, केनिया-4, मालदिव-5, कोरलँड-1, जर्मनी-1, झिंबाब्वे-1, नेपाळ-2, ऑस्ट्रेलिया-1, कझाकीस्तान-1, बँकॉक-4, श्रीलंका-1, अबुधाबी-3, बांगलादेश-2, अशा 60 नागरिकांचा समावेश आहे

दरम्यान, जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत 67 नागरिकांना घरातच अलगीकरण म्हणजे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर दहा नागरिकांना सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली असून सध्या 7 जण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा -जालन्यात शुकशुकाट, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

Last Updated : Mar 22, 2020, 11:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details