जालना - कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली होती. ही गैरसोय टाळायची असेल तर झाडे लावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज (दि. 5 जून) केले. पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
येथील सिंदखेड राजा रस्त्यावर वन व पर्यटन विभागाचे उद्यान आहे. या उद्यानात अटल धन-वन हा एक उपक्रम राबवला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगलाप्रमाणे येथे झाडे वाढली आहेत. याच्याच दुसऱ्या बाजूला आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी वृक्षारोपण केले. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर ,वनविभागाच्या वनसंरक्षक वर्षा पवार यांचे हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.