जालना -कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू केलेली संचारबंदी, याचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसला आहे. त्यात टाळ्या वाजवत आणि विविध सोहळ्यांना उपस्थिती लावून मिळणाऱ्या पैशांतून स्वतःचे पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांवरही कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून रेल्वे तसेच बाजारपेठा बंद आहेत. अशा परिस्थितीत तृतीयपंथीयांकडे असलेली जमापुंजी संपली. काही तृतीयपंथीयांनी स्वतःकडे असलेली जमापुंजी गोरगरीबांमध्ये वाटली. पण आता त्यांच्याकडेच खायला काही नसल्याने तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे ते जालना शहरातील विविध चौकांमध्ये उभे राहून वाहनचालकांकडून पैसे मागून जगत आहेत.