महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील दोन आणि जालना तालुक्यात एक कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

jalana covid hospital
जालना कोरोना रुग्णालय

By

Published : May 10, 2020, 1:00 PM IST

जालना- जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना अंबड तालुक्यात दोन आणि जालना तालुक्यात एक असे तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

अंबड तालुक्यातील दोन आणि जालना तालुक्यातील एक अशा तीन संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे 8 मे रोजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर तिन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details