महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : वसुंधरा नगरमध्ये भरदिवसा पिस्तूल आणि चाकू धाक दाखवून चोरी - jalna crime news

वसुंधरा नगर येथील रहिवासी सावरमल जाल यांचे पारस एजन्सीच्या नावाने नळाचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या घरात घसून पिस्तूल आणि चाकू धाक दाखवून चोरट्यांनी ऐवज लंपास केला.

Theft in Vasundhara Nagar
जालना : वसुंधरा नगरमध्ये भरदिवसा पिस्तूल आणि चाकू धाक दाखवून चोरी

By

Published : May 9, 2021, 10:58 PM IST

जालना -भोकरदन नाका ते मोंढा रस्त्यावर वसुंधरा नगर आहे. येथील रहिवासी सावरमल जाल यांच्या घरी आज दुपारी 12 च्या सुमारास तीन अज्ञात तरुणांनी घरात घुसून चाकू आणि पिस्तूलचा धाक दाखवून 25 हजार रुपये रोख गळ्यातील चैन असा सोन्याचा असा ऐवज लंपास केला.

प्रतिक्रिया

पिस्तूलचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न -

सावरमल जाल यांचे पारस एजन्सीच्या नावाने नळाचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. तळ मजल्यावर दुकान आणि वरच्या मजल्यावर ते स्वतः राहतात. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास काही लोक आले आणि नळाचे साहित्य मागितले. पहिल्या वेळी त्यांना परत पाठवले. मात्र, अर्ध्या तासानंतर पुन्हा तेच लोक परत आले. अखेर जाल यांनी दार उघडून तुम्ही थांबा मी साहित्य आणून देतो, असे सांगितले. दरम्यान, जाल हे घरात गेले असता गेटच्या बाहेर उभे असलेल्या तिघांनी गेटवरून आत उड्या मारल्या. एकाने चाकू आणि दुसऱ्याने पिस्तूलचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केला. यावेळी जाल आणि चोरांमध्ये झटापटही झाली. अखेर आरडाओरड झाल्यानंतर हे तिघेही पळून गेले. जाताना 25 हजार रुपये रोख गळ्यातील चैन असा ऐवज त्यांनी चोरून नेला. तसेच झटापटी दरम्यान त्यांनी पिस्तूल आणि चाकू तिथेच सोडून दिले.

हेही वाचा - मदर्स डे : 'आई आपली पहिली आणि बेस्ट सुपरहिरो असते', सचिनसह खेळाडूंनी मानले आपल्या आईचे आभार

ABOUT THE AUTHOR

...view details