जालना - शहरातील बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. 31 मार्चला स्थानकात असलेल्या हॉकर्सच्या परवान्याची मुदत संपली आहे. तरीदेखील एसटी महामंडळ या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन टेंडर अजून निघाले नाहीत, त्यामुळे फेरीवाल्यांनी बस स्थानकात वाटेल तेथे अतिक्रमण केले आहे.
एसटी महामंडळाचे फेरीवाल्यावर जडले प्रेम ! मुदतबाह्य फेरीवाल्यांना निवारा, तर प्रवाशांना सहन करावा लागतोय उन्हाचा मारा
31 मार्चला शहरातील स्थानकात असलेल्या हॉकर्सच्या परवान्याची मुदत संपली आहे. तरीदेखील एसटी महामंडळ या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन टेंडर अजून निघाले नाहीत, त्यामुळे फेरीवाल्यांनी बस स्थानकात वाटेल तेथे अतिक्रमण केले आहे.
एसटी महामंडळाचे फेरीवाल्यावर जडले प्रेम
जिथे सोयीस्कर जागा आहे, तिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मात्र या फेरीवाल्यांवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस ते करत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना सावलीमध्ये बसायला जागा नसल्यामुळे बस उभारतात त्या फलाटावरच जीव धोक्यात घालून बसावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे एस टी महामंडळ सोयीस्कर दुर्लक्ष करून मुदतबाह्य फेरीवाल्यांना अभय देत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.