जालना - जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून 1 हजार 547 टँकरच्या फेऱ्या करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात 1 हजार 185 फेऱ्या होत असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
जालन्यामध्ये टँकरच्या फेऱ्यांचाही तुटवडा, पाण्यासाठी नागरिकांची वणवण - टँकर
जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून 1 हजार 547 टँकरच्या फेऱ्या करण्यास मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये 28 मे च्या आकडेवारीनुसार 511 गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. खासगी आणि सरकारी अशा एकूण 637 टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या टँकरनी 1 हजार 547 फेऱ्या करणे अपेक्षित आहे. मात्र, या फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामध्ये तब्बल 362 टँकरची तफावत आहे. त्यामुळे उपाययोजना करुनही जनतेला पाण्यासाठी वणवण करत फिरण्याची वेळी आली आहे.
प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. परंतु तांत्रिक बाबींमुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. सध्या खासगी आणि सरकार पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने 685 विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातून 11 लाख 26 हजार 326 नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.