जालना - आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सिटीस्कॅन, केमोथेरेपी, सोलर प्लांट, मनोरुग्णालय विभाग, नर्सिंग लॅब, वेअर हाऊस, तसेच अन्य काही आठ विभागांचे उद्घाटन झाले.
सुप्रिया सुळेंनी आवरता घेतला उद्घाटन समारंभ; चिरंजीवाच्या वाढदिवसाला जाण्याची घाई - जालना जिल्हा सामान्य रुग्णालय
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभागांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सिटीस्कॅन, केमोथेरेपी, सोलर प्लांट, मनोरुग्णालय विभाग, नर्सिंग लॅब, वेअर हाऊस, तसेच अन्य काही आठ विभागांचे उद्घाटन झाले.
आठ ठिकाणच्या उद्घाटनानंतर वेअर हाऊसमध्ये उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. मात्र सुप्रिया सुळे यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी मानपानाला फाटा देत थेट उद्घाटन केले. यामुळे अवघ्या 3 मिनिटांतच त्यांनी आपले मार्गदर्शन आटोपते घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांसोबत फोटो देखील काढले. कोणतीही भाषणबाजी न करता अवघ्या पाच मिनिटांमध्येच हा संपूर्ण कार्यक्रम संपला.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी रवींद्र देशपांडे यांनी उपस्थिती लावली.