महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Farmer Suicide Attempt In Jalna : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्याचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न - शेतकऱ्याने पत्नीसह विषारी औषध आणून आत्महत्येचा प्रयत्न

जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याने पत्नीसह विषारी औषध आणून आत्महत्येचा प्रयत्न केला ( Farmer Suicide Attempt In Jalna ) आहे. साखर कारखाना ऊस तोडणी करायला तयार नसल्याने त्यांनी हा प्रयत्न केला आहे.

Farmer Suicide Attempt In Jalna
Farmer Suicide Attempt In Jalna

By

Published : May 27, 2022, 4:40 PM IST

जालना - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याने पत्नीसह विषारी औषध आणून आत्महत्येचा प्रयत्न केला ( Farmer Suicide Attempt In Jalna ) आहे. साखर कारखाना ऊस तोडणी करायला तयार नसल्याने त्यांनी हा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे.

जालन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्येचा प्रयत्न करणारे पती-पत्नी हे घनसावंगी तालुक्यातील भोगगाव गावचे रहिवासी आहेत. सुभाष आप्पासाहेब सराटे, असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कदम यांचा आठ एकर ऊस तोडणी अभावी उभा आहे. बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या करूनही ऊस तोडणी केली जात नाही. त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती-पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किटकनाशकाची बाटली आणून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती-पत्नीला ताब्यात घेतल्याने पुढला अनर्थ टळला आहे.

हेही वाचा -Aryan Khan Drug Case : पुराव्या अभावी तक्रार नाही; बादशाहचा मुलगा निर्दोष

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details