जालना -एलजीबी कंपनीतील एका कामगाराला कंपनी प्रशासनाने मनमानी पद्धतीने कामावरून काढून टाकल्याचा आरोप कंपनीतील कामगारांनी केला आहे. कंपनीच्या याच मनमानी कारभाराविरोधात कंपनीतील 125 कामगारांनी अखेर बेमुदत उपोषणाचे हत्यार उगारले आहे.
जालन्यातील एलजीबी कंपनीतील कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू हेही वाचा... पीएमसी प्रकरण : तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी ठेवीदारांना मिळू शकतात १ लाख रुपये
मागील चार दिवसांपासून सुरू असलेला एलजीबी कंपनी आणि कामगार यांच्यातील वाद आता वाढला आहे. शनिवारी सचिन पवार नावाच्या एका कामगाराला कंपनीने कामावरून कमी केले. त्यानंतर कंपनी विरोधात कामगार यांच्यातील वादाला तोंड फुटले. रविवारी याच कामगारांपैकी एकाला शासकीय रुग्णालयात भरती करावे लागले, तरीदेखील कंपनीने कामगारांना कामावर न घेतल्यामुळे आज मंगळवारपासून या कंपनीच्या सुमारे सव्वाशे कामगारांनी काम बंद आंदोलन करून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतानाही मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही. कामगारांनी मात्र जोपर्यंत कंपनी प्रशासन युनियन सोबत बोलणार नाही, तो पर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... जळगावातील केऱ्हाळा खुर्द येथे दोन महिलांची हत्या; कापसाच्या शेतात आढळले मृतदेह