जालना - नूतन वसाहत हा दाट वस्तीचा परिसर. येथे चारचाकी वाहन जाणे शक्य ना, अशा या गल्लीबोळात असलेल्या दत्ता गोरखनाथ जाधव याचे घर आहे. याने त्याच्या घरावर असलेल्या पाणीसाठ्याच्या प्लास्टिकच्या टाकीमध्ये विदेशी कंपन्यांच्या दारू बॉटलचे बॉक्स लपवून ठेवले होते. याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी शनिवारी दुपारी या घरावर छापा टाकला. टाकीमध्ये दडवलेला माल जप्त केला.
जालन्यात पाण्याच्या टाकीतून 69 हजार रुपयाच्या विदेशी मद्याचा साठा जप्त - जालना विदेशी दारूसाठी बातमी
शहरातील नूतन वसाहत भागात असलेल्या एका घराच्या पाणी टाकीतून कदीम जालना पोलिसांनी विविध प्रकारच्या 69 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.
जालन्यात पाण्याच्या टाकीतून 69 हजार रुपयाच्या विदेशी मद्याचा साठा जप्त
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी जप्त केलेल्या मालाची कदीम जालना पोलीस ठाण्यात पाहणी केली. यावेळी 69 हजार रुपयांचा हा दारू साठा असल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी कैलास जावळे, सोमनाथ हलगे, हिवाळे, जाधव, यांनी ही कारवाई केली. यापूर्वी देखील कैकाडी मोहल्ल्यामध्ये पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांची देशी दारू आणि ती तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त केले होते.
Last Updated : Jul 12, 2020, 10:38 AM IST