जालना - खामगाव-जालना आणि सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाच्या मागण्या जुन्या आहे. जालना-खामगाव रेल्वेमार्ग व्हावा ही मागणी ब्रिटीश काळापासूनची आहे. आतापर्यंत दोन्हीही रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने प्रत्येकी दोन वेळा सर्व्हेक्षण करण्यात आले असून अलीकडे झालेल्या सर्व्हेक्षणाचे अहवाल सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत माझ्याकडे येतील, त्यानंतरच या दोन्हीही रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते.
'रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने लवकरच निर्णय'
रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज (गुरूवारी) पहिल्यांदाच दानवे यांचे जालन्यात आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते असे म्हणाले की, जालना-खामगाव आणि सोलापूर-जळगाव या दोन्हीही रेल्वेमार्गाचा आढावा घेण्यात आला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अलीकडे झालेल्या सर्व्हेचा आढावा घेतला जाईल आणि या रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
'जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील'