महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समृद्धी महामार्गावर ट्रकचालक मुरूमाऐवजी टाकतात माती; प्रशासनाचे दुर्लक्ष - माती वापर समृद्धी महामार्ग

बदनापूर तालुक्यात सध्या हा महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, या कामात मुरूमाऐवजी चक्क मातीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम पसरवण्यात येत असून तीन ते चार फूट सपाटीपासून मुरूमाचा थर टाकण्यात येत आहे.

samruddhi highway
समृद्धी महामार्गावर ट्रकचालक मुरूमाऐवजी टाकतात चक्क माती

By

Published : Dec 30, 2019, 9:34 AM IST

जालना- बदनापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फायदा येथील ट्रकचालक घेत आहेत. ते चक्क मुरूमाऐवजी मातीचा वापर या महामार्गाच्या कामासाठी करत आहेत, असे असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे काणाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रकचालक मुरूमाऐवजी टाकतात चक्क माती; प्रशासनाचे दुर्लक्ष

हेही वाचा -महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ

नागपूर ते मुंबई हे अंतर कमी वेळात पूर्ण व्हावे, यासाठी समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मोठा प्रकल्प असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंत्राटदारांमार्फत हे काम सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनीही या कामासाठी मोठा निधी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

बदनापूर तालुक्यात सध्या या महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, या कामात मुरूमाऐवजी चक्क मातीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम पसरवण्यात येत असून तीन ते चार फूट सपाटीपासून मुरूमाचा थर टाकण्यात येत आहे. ट्रकद्वारे मुरूम टाकण्यासाठी दिलेले कंत्राटदार हे जवळील परिसरातील नदीचे खोलीकरण करत असून, खोलीकरणातून निघणारी मातीच या महामार्गावर मुरूमाऐवजी पसरवत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. वास्तविक पाहता नदी खोलीकरण करत असताना निघालेली माती हे शेतकऱ्यांच्या शेतीत टाकून त्यात निघणारा मुरूम हा या महामार्गावर टाकण्याची गरज आहे. मात्र, ट्रकचालक चक्क मुरूमाऐवजी मातीच या महामार्गावर टाकत आहेत.

हेही वाचा -आज मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या 'या' पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

दरम्यान, ट्रकचालक हे त्यांच्या फेऱ्या लवकर वाढाव्या या हेतूने ही माती थेट महामार्गावर टाकत असल्यामुळे या महामार्गाच्या कामात हलगर्जीपणाच दिसून येत आहे. मातीमिश्रणामुळे रस्ता कमकुवत होण्याची शक्यता आहे. असे असतानाही मुख्य कंत्राटदार किंवा प्रशासकीय अधिकारीही याकडे का दुर्लक्ष करत आहेत? हे न उलगडणारे कोडे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details