महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsena : शिवसेनेने चारली काँग्रेसच्या पॅनलला धूळ - अर्जून खोतकर - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व 13 उमेदवार निवडून आले आहे. शिवसेनेने या ठिकाणी काँग्रेचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पॅनलला धूळ चारली. मतदानाच्यावेळी शिवसेना आणि काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा राडाही झाला होता. पण, या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांची सरशी झाली आहे.

अर्जून खोतकर
अर्जून खोतकर

By

Published : Jun 20, 2022, 2:23 PM IST

जालना - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व 13 उमेदवार निवडून आले आहे. शिवसेनेने या ठिकाणी काँग्रेचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पॅनलला धूळ चारली. मतदानाच्यावेळी शिवसेना आणि काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा राडाही झाला होता. पण, या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांची सरशी झाली आहे.

बोलताना अर्जून खोतकर

स्वतः आमदार गोरंट्याल हे दोन मतदारसंघातून उभे होते, मात्र त्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. शिवसेनेच्या एकतर्फी विजयानंतर अर्जुन खोतकर यांनी आम्ही काॅंग्रेस आणि भाजप अशा दोघांच्या पॅनलचा पराभव केल्याचे सांगत हा नियतीचा खेळ असल्याची प्रतिक्रिया दिली.

यावेळी अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांनी आपल्याला ग्रामपंचायत क्षेत्रात निवडून येण्याचे चॅलेंज केले होते ते चॅलेंज आपण पूर्ण केल्याचे सांगत आपण काँग्रेस आणि भाजपच्या पॅनलचा पराभव केल्याची मिश्किल टीकाही यावेळी अर्जुन खोतकर यांनी करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच नाव न घेता त्यांना ही डिवचण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा -सोसायटी निवडणुकीत राडा; शिवसेना नेते खोतकर, काँग्रेस नेते गोरंट्याल यांचे समर्थक आमने सामने

ABOUT THE AUTHOR

...view details