जालना - गेल्या आठवडाभरापासून शासनाच्या मानगुटीवर बसलेल्या धामना मध्यम प्रकल्पाच्या डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पाण्याची गळती आटोक्यात आली आहे. मात्र, आता जुन्या शेलूद गावच्या पूनर्वसनाच्या मुद्यावरून गावात राजकारण सुरू झाले आहे. जुन्या शेलुद गावातील जवळपास ३०० ते ४०० लोकांनी धावडा-पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
जालन्यातील शेलुदवासियांचा रास्ता रोको, धामना धरणाला गळती लागल्याने सर्व ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्याची मागणी
गेल्या ४ दिवसापासून धामणा धरणाच्या भिंतीच्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह बुधवारी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर जुन्या शेलुद गावाचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते.
गेल्या ४ दिवसापासून धामणा धरणाच्या भिंतीच्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह बुधवारी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर जुन्या शेलुद गावाचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धरण बांधणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. तसेच दोन अधिकाऱ्यांसह अग्मिशमन दलाचे पथक आणि आपत्कालीन पथक याठिकाणी तैनात केले होते. तसेच जुन्या शेलुद गावाचे नवीन शेलुद गावात, तर पारध येथील गणेश वाडीचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
आयुक्तांच्या सुचनेप्राणे जुन्या शेलुद गावाच्या स्थलांतरासाठी यादी तयार करण्यात आली. यामध्ये गरजू लोकांची नावे वगळून धनदांडग्यांचा समावेश करण्यात आला. यावर आक्षेप घेत शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी एक ग्रामसभा घेतली. त्यावेळी नावांची यादी फाडून निषेध नोंदवला. तसेच आज सकाळी तहसीलदार प्रकल्पास भेट देण्यास येतील. त्यामुळे शेलुद गावातील ३०० ते ४०० लोकांनी धावडा-पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर रास्ता रोको केले. शिवाय तहसीलदार आल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, तहसीलदार न आल्याने आंदोलकांची निराशा झाली. त्यानंतर दुपारच्या सुमारास नायब तहसीलदाराने भेट देत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले.