जालना :जालना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका कुटुंबावर जालन्यात पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ( sex racket jalna ) केला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरातील रेवगाव रोडवर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले : जालना शहरातील कांचन नगर, शिवनगर तसेच नूतन वसाहत भागात घरगुती वेश्याव्यवसाय करणाऱ्या संतोष उढाणला अखेर पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने आज बेड्या ठोकल्या आहेत. रेवगाव रोडवरील एका घरात छापा मारून एक ग्राहक, दोन कॉल गर्ल, ( Two call girls in police custody )सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पती पत्नी आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसापासून संतोष उढाण हा जालना शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याची तक्रार कांचन नगर येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्याने आपले स्थान बदलले होते.