जालना - जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. यासाठी ट्रकद्वारे मुरुम आणि इतर साहित्यांची वाहतूक केली जात आहे. मात्र, या ट्रकसोबत वाळू माफियाचे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रक चालवून प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. हे सर्व ट्रक समृद्धी महामार्गासाठी असलेल्या कामाचे असल्याचे भासवले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनातून चालतात वाळू माफियांचे ट्रक, प्रशासनाची दिशाभूल - बदनापूर जालना
बदनापूर तालुक्यातून समृध्दी महामार्ग जात असून या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. महामार्गाच्या कामासाठी अनेक वाहने धावतात. याच वाहनांमध्ये काही वाळू माफिया अवैधरीत्या उत्खनन केलेली वाळूचे ट्रक चालवतात. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाला हे ट्रक देखील समृध्दी महामार्गाच्या कामाचे असल्याचे समजून दुर्लक्ष करतात.
बदनापूर तालुक्यातून समृध्दी महामार्ग जात असून या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. महामार्गाच्या कामासाठी अनेक वाहने धावतात. याच वाहनांमध्ये काही वाळू माफिया अवैधरीत्या उत्खनन केलेल्या वाळूचे ट्रक चालवतात. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाला हे ट्रकही समृध्दी महामार्गाच्या कामाचे असल्याचे समजून दुर्लक्ष करतात. हे अवैध वाळूचे ट्रक पुढे सोमठाणा दुधनवाडीजवळ असलेल्या खदानीतील पाण्याद्वारे धुऊन पुन्हा याच वाहनाच्या गर्दीत इच्छीत स्थळी नेले जातात. त्यानंतर वाळूचा साठा करून विक्री केली जाते.
महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने या अवैध वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.