महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar : योग्य लोकांना संधी द्यावी लागते, कोल्हापुरातही असंच झालं : शरद पवार

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी ( Kolhapur North By Election Result 2022 ) झाल्या. त्यावर प्रतिक्रिया देतांना शरद पवारांनी भाजपला टोला ( Sharad Pawar Criticized BJP ) लगावला. जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते. कोल्हापूरला देखील असंच झालं, असं ते ( Sharad Pawar On Kolhapur Election Result ) म्हणाले.

योग्य लोकांना संधी द्यावी लागते, कोल्हापुरातही असंच झालं : शरद पवार
योग्य लोकांना संधी द्यावी लागते, कोल्हापुरातही असंच झालं : शरद पवार

By

Published : Apr 16, 2022, 7:54 PM IST

जालना :प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते. कोल्हापूरला देखील असंच ( Kolhapur North By Election Result 2022 ) झालं. कोल्हापूरला एक जागा खाली होती. त्याठिकाणी राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला, असा टोला शरद पवारांनी विरोधकांना ( Sharad Pawar Criticized BJP ) लगावला. जालन्यातील कार्यक्रमात पवार बोलत ( Sharad Pawar On Kolhapur Election Result ) होते.

इथेनॉल प्रकल्पच उदघाटन : शेतकऱ्यांना हक्काचे पैसे देणारं पीक हे ऊस असल्यानं शेतकरी ऊस लागवड करतात. मात्र ऊस लागवड केल्यानंतर शेतकरी 6 महिने काही काम राहत नसल्यानं गावात फिरत मोदीपासून सगळ्याच राजकारणाच्या गप्पा मारत बसतो, असंही पवार म्हणाले. आज पवार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पवार यांच्या हस्ते अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या इथनॉल प्रकल्पाच उदघाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

योग्य लोकांना संधी द्यावी लागते, कोल्हापुरातही असंच झालं : शरद पवार


साखर कारखानदारी सोपी नाही : साखरेची किंमत ही ऊसाची किमंत ठरवते. साखर कारखानदरी चालवणे सोपे नाही. यापेक्षा विधानसभा निवडणूक सोपी, पण कारखाना चालवणं अवघड, असं सांगत राज्यातील सर्व कारखाने अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : हिंदवी स्वराज्य सर्व जातींनी एकत्रित स्थापन केलेले राज्य - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details