जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील दवाखाने आणि औषधविक्री दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही विक्रेते या आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. बदनापूर शहरात वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मंडळींविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर यांनी घेतला.
बदनापुरात 15 विक्रेत्यांवर गुन्हे, विनामास्क फिरणाऱ्यांनाही दंड - मास्क
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील दवाखाने आणि औषधविक्री दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही विक्रेते या आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. बदनापूर पोलिसांनी अशा 15 विक्रेत्यांविरूध्द आपत्ती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
एम.बी.खेडकर यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी सायंकाळी ४ ते ५ दरम्यान शहरातील विविध भागात फळे, भाज्या विक्री करणाऱया १५ जणांविरुद्ध कारवाई केली. तर नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनखाली अभियंता गणेश ठुबे, अशोक बोकन, रशीद दिलावर पठाण, मिलिंद दाभाडे, विजय पाखरे यांनी शहरातील विविध भागात मास्क न वापरता फिरणाऱ्या २० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून घराबाहेर निघणाऱ्यांनी मास्कचा वापर करावा असे, आवाहन करुनही नागरिक पालन करत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन असेपर्यंत नियमित कारवाई सुरू राहणार, अशी माहिती डॉ. पल्लवी अंभोरे यांनी दिली.