जालना-आपल्या नातेवाईकाचा मृत्यू हा डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, असा समज करून त्या रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. निळकंठ नगरमधील रणधीर रुग्णालयात ही घटना घडली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. राज दत्तात्रय रणधीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यातील मृत तरुण अमोल गोरे हा त्यांच्या ओळखीचा आहे. तसेच अनेक वेळा फिरायला ही सोबत गेले होते. त्या अनुषंगाने अमोल गोरे हा नेहमी उपचारासाठी डॉ. रणधीर यांच्याकडे येत होता. त्यानुसार 28 फेब्रुवारीला देखील अमोल गोरे तपासणीसाठी आला होता. मात्र, आपण घरी नसल्यामुळे पत्नी डॉ. मधुलीना रणधीर यांनी त्यांना एक तारखेला बोलावले. त्यानुसार पुन्हा अमोल गोरे तपासणीसाठी आले. त्यांच्यामध्ये न्यूमोनियाची लक्षणे वाटल्याने एक्स-रे काढण्यासाठी सांगितले आणि तात्पुरत्या गोळ्या देऊन 2 दिवसांनी तपासणीला बोलावले. ते पुन्हा तीन तारखेला आले. पुन्हा न्यूमोनियाची लक्षणे दिसली. एक्स-रेबाबत विचारले असता तो काढला नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. या चाचणीनंतर ते पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांची पत्नी सारिका गोरे यांच्यासोबत मोबाइलवरून संपर्क करून चौकशी केली.
रविवारी रात्री झाली तोडफोड