महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय रेल्वेला 1 रुपयामधून 48 पैसे तोटा - रावसाहेब दानवे - रावसाहेब दानवे

नवीन तसेच जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी येत असलेला तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरु असल्याचे देखील ते म्हणाले.

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे

By

Published : Aug 22, 2021, 4:57 PM IST

Updated : Aug 22, 2021, 5:33 PM IST

जालना - भारतातील रेल्वे सध्या तोट्यात आहे. रेल्वेला एक रुपयामागे ४८ पैसे तोटा सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेली रक्कम अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे खात्याला दिल्याने रेल्वेचा कारभार रुळावर आला आहे, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. आज (रविवारी) जालन्यात दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या भुयारी पुलाचे उद्घाटन आणि नवीन तसेच जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी येत असलेला तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरु असल्याचे देखील ते म्हणाले.

मंत्री वसाहेब दानवे



या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. खोतकर पिता - पुत्रांनी लोखंडी पुलाचे खोटे उद्घाटन करून जुना आणि नवीन जालना भागाला तोडण्याच काम केले असून बाप बाप काढतो तर मुलगा खानदान काढण्यात गुंतल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले आहे. हा संस्कारातील फरक असल्याचा टोलाही गोरंट्याल यांनी खोतकरांना लगावला आहे.

हेही वाचा -जन आशीर्वाद यात्रेतून राणे कोकणात कोरोनाची तिसरी लाट आणत आहेत - विनायक राऊत

Last Updated : Aug 22, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details