जालना :केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांच्या हस्ते जालना ते छपरा या साप्ताहिक रेल्वेची सुरुवात करण्यात आली. उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वेची दिवाळी भेट ठरली (inaugurated Jalana to Chhapra Railway) आहे.
आनंदाचे वातावरण :जालना ही औद्योगिक नगरी असल्याने, उत्तरप्रदेश,बिहार मधील अनेक कामगार कामासाठी जालन्यात येतात. त्यांना गावाकडे परत जाण्यासाठी जालना ते मनमाड व मनमाडवरून दुसऱ्या रेल्वेने जावे लागायचे. परंतु ही रेल्वे सुरू झाल्याने या लोकांची मोठी सोय झाली, असून आता जालन्याहून थेट प्रवास करता येणार आहे. उत्तरप्रदेश, बिहार येथून आलेले जालन्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या रेल्वेमुळे खूप सोय झाल्याची प्रतिक्रिया याच ट्रेनने जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील प्रवाशांनी दिली (Jalana to Chhapra Railway) आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना ते छपरा या साप्ताहिक रेल्वेची सुरुवात जनसेवेला महत्त्व :कित्येक वर्षांपासून जालना जिल्ह्यातील उत्तरप्रदेशातून इथे आलेल्या नागरिकांची मागणी होती. रेल्वे खाते मिळाल्यानंतर त्यांची मागणी पूर्ण करण्यात आपल्याला यश मिळाल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. या रेल्वेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ९६ टक्के बुकिंग झालेले असून पुढच्या आठवड्याची गाडी पूर्ण बुक झालेली आहे. असाच प्रतिसाद मिळाला तर पुढील काळात ही गाडी दैनिक करायचा विचार करू असेही दानवे म्हणाले. दैनंदिन ट्रेन चालवणे फायद्याचे नसते. पण मोदींच्या संकल्पनानुसार आम्ही फायद्याचा विचार न करता जनसेवेला महत्त्व देतो. हा तोटा प्रवासी गाड्यांमधून भरून काढतो. मोदींचे सरकार फायद्यासाठी काम करत नसून लोकांच्या सुविधेसाठी चालवल्या जातात. औरंगाबाद ते नांदेडच्या दुहेरी करणाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून त्याचा डीपीआर देखील झालेला असून रेल्वे बोर्डात जालना जळगाव आणि मनमाड ते औरंगाबाद या दोन्ही कामाची चर्चा झाली असल्याचेही दानवे (Raosaheb Danve inaugurated Railway in Jalna) म्हणाले.
रेल्वे मार्गाचे स्वप्न :या कार्यक्रमात आमदार कैलास गोरंट्यल यांचीही उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, त्यांनी रेल्वे संघर्ष समितीत काम करीत असताना, ज्या रेल्वे मार्गाचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी उपोषण, आंदोलन केले होते, ते आता दानवे यांच्यामुळे सत्यात उतरले आहेत. त्यामुळे दानवे यांचे आभार मानले. उत्तरेकडे जाणारी रेल्वे चालू झाली. लवकरच दक्षिणेत जाणारी गाडी चालू होणार, त्यामुळे तिरुपतीकडे जाणाऱ्या भाविकांची सुविधा होणार आहे. येथिल भाविकांची शिर्डीसाठी गाडी उपलब्ध होणार, यासाठी देखिल त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार (Railway in Jalna) मानले.