जालना -जिल्ह्यासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले भोकरदन तालुक्यातील राजूर येथील गणपतीचे मंदिर उद्या बुधवार दिनांक 31 रोजी असलेल्या चतुर्थीला बंद राहणार आहे .साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेला राजूर येथील राजुरेश्वर गणपती हा भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. दर महिन्याच्या चतुर्थीला इथे लाखो भाविकांची गर्दी असते. गेल्या महिन्यातील चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी होती. या दिवशीदेखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये राजुरमध्ये संचारबंदी लावली होती. त्यामुळे भाविकांना कळसाचे देखील दर्शन घेता आले नाही. तशीच परिस्थिती उद्याच्या चतुर्थीनिमित्त आहे.
कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी देऊळ बंद