महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्येही अवैध गुटखा वाहतूक, २ लाख ८० हजाराचा गुटखा पकडला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जमावबंदी व अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंदी आहे. मात्र, लॉकडाऊन काळातही अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धंदे सुरूच असून मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाकेबंदी असल्यामुळे हे गुटखा विक्री करणारे आडमार्गाचा वापर करत असल्याचे आढळून येत आहे.

Raid on Illegal Gutakha transport in lockdown at Badnapur
लॉकडाऊनमध्येही अवैध गुटखा वाहतूक, २ लाख ८० हजाराचा गुटखा पकडला

By

Published : Apr 27, 2020, 7:53 AM IST

जालना (बदनापूर) - लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद असताना आडमार्गाने बंदी असलेला अवैध गुटखा वाहतूकीचे प्रकार समोर येत आहेत. चिखली - दाभाडी रस्त्यावर बदनापूर रस्त्यावर बदनापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून २ लक्ष ८० हजार किमतीच्या २० बॅग गुटखा व एक कार जप्त करून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केल्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

लॉकडाऊनमध्येही अवैध गुटखा वाहतूक, २ लाख ८० हजाराचा गुटखा पकडला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जमावबंदी व अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंदी आहे. मात्र, लॉकडाऊन काळातही अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धंदे सुरूच असून मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नाकेबंदी असल्यामुळे हे गुटखा विक्री करणारे आडमार्गाचा वापर करत असल्याचे आढळून येत आहे. चिखली ते दाभाडी या रस्त्यावर आज एक मारुती डिझायर कार (क्रमांक एमएच 06, एझेड 9954) मधून चोरटी गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिस निरीक्षक मारुती खेडेकर यांना मिळाल्यावरून बदनापूर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

अवैध वाहतूक करणारी कार

या रस्त्यावर दाभाडी बिटचे पोलिस कर्मचारी अनिल चव्हाण यांनी राजूरकडून येणाऱ्या या कारला थांबवले असता कारमध्ये चालकाची अधिक चौकशी केली. मात्र, चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने कारची डिक्की तपासली असता या कारमध्ये अवैधरित्या विक्री करण्यासाठी गुटखा दिसून आला. पोलिस निरीक्षक खेडकर यांनी अन्न व औषधी कार्यालयातील अधिकाऱ्यांना या बाबत कळवले. अन्न व औषधी विभागाचे अधिकारी जालन्याहून बदनापूर येथे दाखल झाल्यानंतर कारमधील गुटखा बाहेर काढण्यात आला. या वेळी २० गोण्या भरून हा गुटखा असल्याचे दिसून आले. या गुटख्याची किंमत २ लक्ष ८० हजार इतकी असून बदनापूर पोलिसांनी सदरील कार व गुटखा असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी चालकाची चौकशी केल्यानंतर सदरील गुटखा राजूर परिसरातून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, अनिल चव्हाण, यांच्या पथकाने थेट राजूर येथे धडक मारुन यातील शोध घेऊन आरोपी निसार अनिस सिद्दीकी, रा. भोकरदन व संदीप भूमकर, रा. राजूर याला पकडून गुन्हा नोंद केला आहे. बदनापूर पोलिसांनी आडरस्त्याने वाहतूक होणारा गुटखा व त्याची आरोपी अवघ्या ४ तासात जेरबंद केल्यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details