जालना- पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अंबड येथे घडली आहे. कपिल प्रतापराव शिंदे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अंबड येथे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - आत्महत्या
कपिल प्रतापराव शिंदे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
कपिल प्रतापराव शिंदे
कपिल हा परभणी येथील असून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेण्यासाठी सध्या अंबड येथील शिवनगर येथे भाड्याने खोली घेवून राहतो. दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६ ते दिनांक १२ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान कपिलने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये सिव्हील डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात तो शिक्षण घेत होता. त्याने राहत्या घरातील फॅनला दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.