जालना -सदर बाजार परिसरातील वसुंधरा नगरात दिनांक 9 मे रोजी भर दुपारी गावठी पिस्तूल दाखवून व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. सावरमल जाला असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. चोरट्यांनी त्यांच्याकडून 60 हजारांचे दागिने लुटून पोबारा केला होता. पंधरा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना या गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन पिस्टल व सोन्याचे दागिने मिळवण्यात यश आले आहे. पोलिसांनी एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
व्यापारी सावरमल जाला यांना नळ दुरुस्तीचे साहित्य मागण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तीघे जण आले होते. नळाच्या दुरुस्तीसाठी एलबो द्या अशी मागणी ते करू लागले, सुरुवातीला नाही म्हटल्यावर पुन्हा अर्ध्या तासाने हे तिघे आले आणि साहित्य देण्याचा आग्रह करू लागले. त्यामुळे सावरमल जाला हे घरात वळाले त्याचवेळी या तीन आरोपींनी गेटवरून घरात उड्या मारल्या आणि पिस्टलचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि अंगठी काढून घेतली. दरम्यान घरात लुटमार करण्याच्या उद्देशाने एक जण घरात गेला त्याच वेळी सावरमल जाला आणि दुसर्या एका आरोपीमध्ये झटापट झाल्यामुळे चोरट्यांचे नियोजन फसले व त्यांनी पोबारा केला.
आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली