जालना - गोंदी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांनी सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे. परजने यांनी शासकीय निवासस्थानातच गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांचे वय अवघे ४१ वर्षे होते.
कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांची आत्महत्या - पोलीस महानिरीक्षक
कर्तव्यदक्ष पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांनी आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक अनिल परजने
औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यसह वरिष्ठ अधिकारी गोंदीकडे रवाना झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परजने हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा करण्यात येत आहेत.