महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalna Anti Corruption PI Missing : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बेपत्ता

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ( Jalna Anti Corruption Bureau ) पोलीस निरीक्षक दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता ( Police Inspector Missing ) झाले आहेत. 2 जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडलीय. संग्राम ताटे असे या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Jalna Anti Corruption PI Missing
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बेपत्ता

By

Published : Feb 4, 2022, 3:37 PM IST

जालना - जालना येथील लाचलुचपत विभागातील पोलीस निरीक्षक मागील दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता ( Jalna Anti Corruption PI Missing ) झाल्याची घटना घडली आहे. मागील दोन दिवसापुर्वी पत्नीला भेटायला जातो म्हणून घरातून बाहेर पडलेले पोलीस निरीक्षण संग्राम ताटे बेपत्ता ( Police inspector of anti Corruption department ) झाले आहेत.

पोलीस निरीक्षक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ -

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ( Jalna Anti Corruption Bureau ) पोलीस निरीक्षक दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. 2 जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडलीय. संग्राम ताटे असे या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मित्राला भेटून येतो म्हणून पडले होते घराबाहेर -

संग्राम ताटे यांच्या पत्नींनी कदीम जालना पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे मित्राला भेटायला चाललो असे सांगून घरातुन बाहेर पडले. ते येथील यशवंतनगर परिसरात राहतात. यावेळी त्यांनी मोबाईल, गाडी सोबत नेले नव्हते. दरम्यान ताटे हे दोन दिवसांपासून घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीनी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून ते बेपत्ता झाले असल्याची फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी त्यांची शोध सुरु केला आहे. पुढील तपास कदीम जालना पोलीस स्टेशनचे आधिकारी करत आहेत.

हेही वाचा -Clove Stuck in Woman Lungs : सात वर्षापूर्वी फुफ्फुसात अडकली लवंग; परिणाम चार वर्षानंतर, डॉक्टरांनी दिले जिवदान

ABOUT THE AUTHOR

...view details