जालना -14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विविध मनोरंजनाचे आणि बालकांशी निगडीत असलेले कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, याच दिवशी सदर बाजार पोलिसांनी दोन बालकांना आणि दोन मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे. हे सर्व सोळा वर्षे वयोगटाच्या आतील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.
जालन्यात घरातून पळालेले मुले पालकांच्या स्वाधीन शहरातील मोदीखाना येथून १३ वर्षांचा मुलगा बुधवारी सकाळी घरातून शिकवणीला जात आहे, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही. त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात किरकोळ माहिती दिली. मात्र, तक्रार दिली नव्हती. तरीदेखील पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. हा मुलगा नांदेडला असल्याचा एकाने फोन केला. तो धागा पकडून सदर बाजार पोलिसांनी या मुलाला नांदेडवरून रेल्वेमध्ये बसवून देण्यास सांगितले. नांदेड पुणे पॅसेंजरने तो सुखरूप घरी आला. दरम्यान, आपण स्वतःहून घरातून निघून गेल्याचे सांगितले.
हे वाचलं का? - भोकरदनमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ
दुसऱ्या प्रकरणात पुणे येथून एक १६ वर्षांची मुलगी बुधवारी रात्री खासगी ट्रॅव्हल्सने औरंगाबाद चौफुलीवर उतरली. मला आई-वडील नसल्याचे तिने सांगितले. तसेच ब्युटी पार्लरचा कोर्स केला आहे आणि कामासाठी औरंगाबादला आले असल्याचे तिने सांगितले. पुणे येथे काम करणाऱ्या भावाने ओळखीच्या व्यक्तीद्वारे ट्रॅव्हल्सने बसवून दिले. औरंगाबादला उतरल्यानंतर एक मुलगा घेण्यासाठी आला. त्यांच्या घरी रात्रभर राहिले आणि दोघा नवरा बायकोची भांडणे पाहून परत गुरुवारी सकाळी जालना बस स्थानकावर येऊन बसले. दिवसभर बसल्यानंतर पोलिसांचे माझ्यावर लक्ष गेले आणि त्यांनी सखोल चौकशी करून पोलीस ठाण्यात आणले आहे. माझी खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था त्यांनी केली आहे. मात्र, जालन्यात कुठे कसे जायचे? हे मला माहीत नाही, असे त्या मुलीने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पुणे येथील पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्या मुलीला त्यांच्या स्वाधीन केले आहे.
हे वाचलं का? -साताऱ्यात महिलेचा संशयास्पद मृत्यू, बंद फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
तिसर्या प्रकरणात वाशिम येथील अल्पवयीन मुलगा आणि मुलीने लग्न करून येथील दुःख नगर भागात नातेवाईकांकडे थांबले असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली. त्यानंतर वाशिम येथील पोलिसांशी संपर्क करून सदर बाजार पोलिसांनी हे अल्पवयीन जोडपे वाशिम पोलिसांच्या स्वाधीन केले केले आहे.