महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना विनयभंग प्रकरण; चार आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी तर एकाची बाल सुधारगृहात रवानगी

जालन्यातील देऊळगाव राजा शिवारातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व फौजफाटा याप्रकरणी तपास केला आहे.

jalna police
जालना विनयभंग प्रकरण ; चार आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी तर एकाची बाल सुधारगृहात रवानगी

By

Published : Feb 1, 2020, 9:06 PM IST

जालना -गोंदेगाव शिवारात एका युवक व युवतीला मारहाण करुन युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. आरोपीनीं या घाणेरड्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केला होता. पोलिसांनी काल (शुक्रवारी) दिवसभर तपास करुन पाच आरोपींना अटक केले होते. आज (शनिवारी) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने यातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी तर एकाची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

हेही वाचा - 'त्या' व्हिडिओप्रकरणी अखेर ९ जणांवर गुन्हा दाखल

सुशील साहेबराव वाघ, अतिशअण्णा खंदारे, कारभारी रामभाऊ वाघ, विशाल गोपीनाथ कुटे या चार जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तर एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींवर विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details